राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे
किशोरवयीन मुलांच्या मध्ये उंचीनुसार त्यांचे वजन असत नाही् त्यांचा BMI कमी असतो औषध उपचाराशिवाय संतुलित आहार योजनेद्वारे त्यांचा बीएमआय सामान्य पातळीपर्यंत आणण्यासाठी नववी मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या किशोरवयीन मुलांच्या बीएमआय चा तुलनात्मक अभ्यास व उपाय योजना हा संशोधन प्रकल्प राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला गेला आहे*
नियोजित माजी विद्यार्थी मेळावा
*प्रिय माजी विद्यार्थी मित्रहो,*
आपणांस कळविणेस अत्यंत आनंद होत आहे की आपल्या *श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊस, कोल्हापूर* या मातृसंस्थेला *१ जुलै २०२० साली १०० वर्षे* पूर्ण होत आहेत. हे *शतकमहोत्सवी वर्ष* १ जुलै, २०१९ पासून सुरु झाले आहे. या शतकमहोत्सवी वर्षात आपण विविध उपक्रम आयोजित करत आहोत. आम्ही खास आपल्या सर्वांसाठी या शतकमहोत्सवी वर्षात माजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा आयोजित करू इच्छितो. यानिमित्ताने सर्व माजी विद्यार्थ्यांना आपल्या *शाळेला व शाळेतील बालपणीच्या मित्रांना भेटण्याची संधी* आम्ही उपलब्ध करून देत आहोत. *गेल्या ५९ वर्षातील* सर्व माजी विद्यार्थ्यांची माहिती यामाध्यमातून संकलित करण्याच्या हेतूने शाळेच्यावतीने एक फॉर्म तयार केला आहे. कृपया आपण वरील लिंकवर जाऊन क्लिक करून *आपली माहिती भरून सहकार्य करावे* ही विनंती.
धन्यवाद!
आपले,
*श्री. ए.एस.रामाणे,*
*प्राचार्य, महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर*
*कृपया सदर लिंक आपल्या संपर्कातील सर्व बॅचमेट्सना पाठवून सहकार्य करावे.*
विद्यार्थी मेळावा लिंक
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
- Gunvant Shikshak Award 2017 presented by Shri Prince Shivaji Maratha Bourding House, Kolhapur.
Gunvant Sevak Purskar 2017 presented by Shri Prince Shivaji Maratha Bourding
स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल प्रथम क्रमांकावर...
बापूराव बाळकृष्ण जोशी सार्वजनिक विश्वस्त निधी, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सौ. पुष्पांजली आडिवरेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत
महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनि.कॉलेज, कोल्हापूरने प्रथम क्रमांक मिळविला. ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शिवराम भोजे यांचे हस्ते पुरस्कार स्विकारताना मुख्याध्यापक व्ही.बी.लोहार सर व शाळेचा स्टाफ.. तसेच ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ मा. डी.बी.पाटील, मा. श्री आडिवरेकर साहेब व मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी दिसत आहेत.